Mumbai Crime News: सोन्याच्या कारखान्यात कामगारांकडून हेराफेरी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

चौघांनी चोरी केलेल्या मालाची अंदाजे किंमत १ कोटी ५६ लाख रुपये इतकी आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam tv

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईच्या वनराई पोलिसठाणे हद्दीत चोरीची एक मोठी घटना घडली आहे. सोन्याच्या कारखान्यात चोरी करणाऱ्या मॅनेजर आणि सिक्युरिटी गार्ड सहित चौघांना अटक केली आहे. अटक केलेले चौघे मागील चार महिन्यांपासून सिक्युरिटी गार्ड सोबत मिळून कारखान्यात चोरी करत होते. चार महिन्यांच्या काळात या चौघांनी दोन किलो सातशे ग्रॅम सोने आणि प्लॅटिनम सोबत अडीच किलो चांदीची बिस्किटे देखील चोरले असल्याचे तपासात समोर आले आहे. या चौघांनी चोरी केलेल्या मालाची अंदाजे किंमत १ कोटी ५६ लाख रुपये इतकी आहे. (Latest Mumbai Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार कामा ज्वेलर्स या फॅक्टरीमध्ये एक आरोपी नोकरी करत होता. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या वजनात हेराफेरी होत असल्याचे फॅक्टरी मॅनेजरच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वनराई पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या दोन पथकांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले.

Gold Price Today
Pune Crime : शासकीय विश्रामगृहात महिलेवर अत्याचार; शिवसेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

यानंतर तपास अधिकारी क्राईम पी आय राणी पुरी, संजय चौधर, एपीआय प्रथमेश विचारे, पीएसआय शिंदे,पोलीस हवालदार निसार,पालवे, मोरे, पाटील, लोणी या सर्व तपास अधिकाऱ्यांनी मिळून अवघ्या २४ तासातच चारही आरोपींना मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले.

Gold Price Today
Meerut Theft News : चोरट्यांनी दागिन्यांच्या दुकानात घुसण्यासाठी खोदला 15 फूट बोगदा, तिजोरीवर लिहिले 'सॉरी'

कामा ज्वेलरी फॅक्टरीमध्ये ४०० पेक्षा अधिक कामगार काम करत होते. या सर्व कामगारांची स्क्रीनिंग होऊनच त्यांना आत व बाहेर सोडले जात होते. मात्र स्क्रीनिंगची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकाची कधीही तपासणी होत नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत इतर तीन आरोपींनी सुरक्षारक्षकाच्या मदतीने कारखान्यातून

मागील चार महिन्यापासून तब्बल एक किलो ७०० ग्राम पेक्षा अधिक सोने,प्लॅटिनम आणि चांदीची बिस्कीट लंपास केली होती.

वनराई पोलिसांनी हाच धागा पकडून सुरक्षारक्षकाची कसून चौकशी केली. त्यावेळी हा गुन्हा उघडकीस आला व त्याने इतर साथीदारांची नावे देखील पोलिसांना सांगितली यानंतर पोलिसांनी वांद्रे,नालासोपारा, जोगेश्वरी आणि नायगाव परिसरातून इतर तिघांना अटक केली. मेहुल ठाकुर (26 वर्ष) निकेश मिश्रा (33 वर्ष) अविनाश बहादुर (27 वर्ष) हरिप्रसाद तिवारी (27 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? याविषयीचा तपास वनराई पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com