Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video : "मी गुजराती..." पुण्यात भाषेवरून राडा! मराठी न बोलणाऱ्या तरुणाला हात जोडून मागायला लावली माफी; पहा व्हिडिओ

Pune Gujrati Youth Marathi Controversy : पुण्यात पार्किंग वादातून भाषावाद पेटला. “मी मराठी बोलणार नाही, मी गुजराती आहे” म्हणणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी घेरलं. माफी मागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यात गुजराती तरुणाने मराठीत बोलण्यास नकार दिला

  • स्थानिक तरुणांनी विरोध करीत त्याला माफी मागायला भाग पाडले

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • भाषावाद पुन्हा एकदा पेटला

मराठी बोलण्यावरून वाद होणारे अनेक व्हिडिओ आपण दररोज सोशल मीडियावर पाहतो. कधी मराठीसाठी मारामारी, तर कधी हिंदीसाठी परप्रांतीयांचा आडमोठेपणा पाहायला मिळतो. आता यात आणखी एका पुण्यातील व्हिडिओची भर पडली आहे. पुण्यात एका तरुणांकडून "मी मराठी बोलणार नाही मी गुजराती आहे" असं बोलण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा भाषावादाने डोकं वर काढलं आहे.

व्हिडिओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, पुण्याच्या रस्त्यावर एक तरुण आपली गाडी पार्क करतो. पार्किंगचा चार्ज देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने पार्किंग चालकाशी त्याने वाद घातला. पार्किंगचा चार्ज घेणारा व्यक्ती मराठीत बोलतो आहे पण व्हिडिओमधील तरुण त्याला हिंदीतच उत्तरं देत राहतो. शिवाय “मला मराठी येत नाही, मी गुजराती आहे," असं तो वारंवार म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आजूबाजूला जमलेल्या काही स्थानिक तरुणांचा राग अनावर झाला.

संतप्त झालेल्या तरुणांनी “इथे पुण्यात राहायचं तर मराठी शिकायला काय हरकत आहे?” असा सवाल करत त्यांनी या गुजराती तरुणाला घेरलं. वाद इतका वाढला की, शेवटी त्याला हात जोडून “सॉरी, मी चुकीच बोललो” अशी माफी मागायला भाग पाडलं गेलं.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान हा व्हिडिओ नेमका पुण्यातील कोणत्या भागातील आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. काहींनी त्याच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. तर काहींनी गुजराती तरुणाचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanya Malhotra : सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती! मुंबईत घेतले आलिशान घर; गृहप्रवेशाचे फोटो शेअर करून दिली गुडन्यूज, किंमत किती?

Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह

Anda Curry Recipe: आज रविवार आहे, घरीच बनवा गावरान स्टाईल अंडा करी, सोपी आहे रेसिपी

Pune : पुण्यात सैराट! फोन करून बोलावलं, जीव जाईपर्यंत मारलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Blood Sugar Test Timing: ब्लड शुगर चेक करण्याची योग्य वेळ कोणती? झोपेतून उठल्यानंतर की नाश्ता केल्यानंतर?

SCROLL FOR NEXT