याच नितेश राणेंनी RSS चा हाफ चड्डीवाले असा उल्लेख केला होता - राऊत Saam TV
मुंबई/पुणे

याच नितेश राणेंनी RSS चा हाफ चड्डीवाले असा उल्लेख केला होता - राऊत

'संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या बाजूने आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि ताकदवान आहेत. त्यांचा कोणत्याही मंत्री पदावर डोळा नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांवरती अनेक आरोप केले आणि राणेंच्या याच आरोपांवरुन आता संजय राऊतांच्या समर्थनार्थ विनायक राऊत (Vinayak Raut) उतरले असून त्यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राणेंची (Narayan Rane) पोलखोल केली.

राऊत यावेळी म्हणाले, 'कालच्या पत्रकार परिषदेतून बाण सुटले त्यामुळे काही जण घायाळ झालेत तर काही विव्हळत आहेत राणेंनी देखील आज पत्रकार परिषद घेतली संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत; मात्र बाळासाहेबांनी राणेंना नेते पदाची उपाधी कधी दिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना नेते पदाची जबाबदारी दिली नाही यातूनच त्यांची काय लायकी आहे ते दिसून येते असा घणाघाती टोलाही यावेळी राऊत यांनी राणेंना लगावला.

दरम्यान या व्हिडीओद्वारे त्यांनी किरीट सोमय्यांवर राणेंनी केलेल्या आरोपाचाच आधार घेत आम्ही आरोपांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. तसंच या प्रकरणाची चौकशी झाली का ?हे ED कार्यालयात जाऊन विचारणार असल्याचही विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान हा आम्ही फक्त पहिला टप्पा दिला आहे. राणेंचे असे अनेक टप्पे आहेत आम्ही ते वर्षभर देऊ शकतो. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या बाजूने आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि ताकदवान आहेत. त्यांचा कोणत्याही मंत्री पदावर डोळा नाही. शिवाय राऊतांनी नव्हे तर राणेंनी आजवर फक्त खुर्चीसाठी बेईमानी केली आहे. डोक्यावर नकली केस असले म्हणून बुद्धी असली पाहिजे असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

हे देखील पहा -

तसंच या नितेश राणे यांनी RSS चा हाफ चड्डीवाले असा उल्लेख केला होता, दरम्यान राणे यांनी स्वतः निर्माण केलेल्या पक्षाची देखील बेईमानी केली आहे. आज त्यांना जो अमित शहा, मोदी यांच्या प्रेमाचा कंट फुटला तो किती बेगडी आहे ते दिसत असल्याचही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

SCROLL FOR NEXT