Fadnavis On Vinayak Mete Death News Saam TV
मुंबई/पुणे

Vinayak Mete: आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! विनायक मेटे आपल्या शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते?

Devendra Fadnavis On Vinayak Mete Death News: "...त्या खारीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा" असंही विनायक मेटे म्हणाले आपल्या शेवटच्या भाषणात फडणवीसांना म्हणाले होते.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त केला आहे. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दांत फडणवीसांनी मेटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शेवटच्या भाषणात विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केलं होतं. (Vinayak Mete Death News)

हे देखील पाहा -

मेटेंच्या अपघाताची बातमी मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात पोहोचले. त्यांनी मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फडणीवस म्हणाले की, विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला.

तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे. गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले असं म्हणत त्यांनी विनायक मेटेंना श्रद्धजली वाहिली आहे.

दरम्यान विनायक मेटेंनी १६ जुलैला २०२२ ला आपला वाढदिवस साजरा केला होता. १६ जुलैला मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना विनायक मेटेंनी मोठं वक्तव्य केलं होतं. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री आहात" असं वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले होते.

विनायक मेटे म्हणाले होते की, आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात असं मोठं वक्तव्य विनायक मेटे यांनी केलं होतं. तसेच मी या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिलं नाही अशी टीका त्यांनी केली होती.

सोबतच विनायक मेटे फडणवीसांना उद्देशून म्हणाले होते की, मला तुमच्या बदल आम्हाला खात्री आहे. तुम्ही शब्द दिला होता, सरकारमध्ये घेण्याचा ते जरी पाळले नसतील तरी आम्ही तुमच्यासोबत असू. 2014 मध्ये सत्तेमधून मी विरोधी पक्षात गेलो, मला आणि लोकांना तुमचं ऐकायचं आहे. तुम्ही आम्हाला न्याय दया, अन्याय द्या पण आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत. आम्ही वेडे मराठे आहोत, प्रेम किती करायला लागलं तर कळत नाही. तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खारीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा असंही विनायक मेटे म्हणाले आपल्या शेवटच्या भाषणात फडणवीसांना म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT