maval bandh, kothurne village, police, kamshet police, Uma Khapare saam tv
मुंबई/पुणे

Maval Bandh : शाळेजवळ आढळला मुलीचा मृतदेह, युवकास अटक; मावळात कडकडीत बंद

कामशेत पोलिसांनी केली संशयित आराेपीवर कारवाई.

दिलीप कांबळे

Maval Bandh News : पवन मावळातील (Maval) कोथर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह बुधवारी एका शाळेच्या पाठीमागे मिळाला हाेता. या प्रकरणात पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केल्यानंतर त्यास अटक केली. दरम्यान संशयित आराेपीस फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज (गुरुवार) पवनानगर भागात कडकड़ीत बंद पाळण्यात आला.

या प्रकरणी कामशेत पोलिसांनी तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला अटक केली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत तसेच खूनाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मावळ येथील कामशेत, वड़गाव याठिकाणी नागरिक एकत्रित आले. त्यांनी निषेधाच्या घाेषणा देत संशयितास कठाेर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. पवनानगर बाजारपेठ आज पुर्णत: बंद ठेवण्यात आली हाेती.

Kamshet Police Arrested Accused In Kothurne village Incident.

दरम्यान या बंदमधून शाळा आणि शैक्षणिक संस्थांना वगळण्यात आले हाेते. सर्व शाळा व शिक्षण संस्थांमध्ये पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करावी असे संबंधित सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं हाेते.

या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मावळ तालुक्यातील विविध संघटनांनी केली आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालवावा तसेच संशियत आरोपीच्या आईस सहआरोपी करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना करणार असल्याचे आमदार उमा खापरे यांनी सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

protest against kothurne village.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT