Parbhani : त्यानं लुटलेलं, आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे : आमदार रत्नाकर गुट्टे

आमदार गुट्टे यांच्या विधानाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
MLA Ratnakar Gutte, Parbhani
MLA Ratnakar Gutte, Parbhani saam tv
Published On

MLA Ratnakar Gutte : निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू झाली असून हवसे नवसे गुडग्याला बाशिंग बांधून आहेत. त्यातच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी काही नेते बेधडक विधानं करीत आहेत. असेच एक विधान रासप आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांचे सध्या सर्वत्र व्हायरल हाेऊ लागले आहे. आमदार गुट्टे यांनी निवडणुकीत तिघांचे पैसे घ्या आणि चाैथ्याला मतदान करा असं म्हटलं आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तुमची काम झालं नाहीत तर चाैथ्याची काॅलर पकडून त्याला तुला फुकट निवडून दिलं आहे असे सांगत त्याला जाब विचारा असेही आमदार गुट्टे यांनी नमूद केले. (MLA Ratnakar Gutte Viral Video News)

रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश होता. त्यावेळी ते गंगाखेड येथे आयोजिलेल्या सभेत बोलत होते. आमदार गुट्टे म्हणाले खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात. त्यांनी जनतेलाच लुटलेलच असते. त्यामुळे त्यांना आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे. (Parbhani Latest Marathi News)

MLA Ratnakar Gutte, Parbhani
Tulika Maan : वडिलांच्या खूनानंतर सावरली तुलिका मान; बर्मिंगहॅमला तिरंगा फडकल्याचा आनंद, पण...

त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन उमेदवारांचे पैसे घेऊन चौथ्या उमेदवाराला मतदान करा असं आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मतदारांना जाहीर सभेत सांगितलं आहे. आमदार गुट्टे यांच्या विधानाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

MLA Ratnakar Gutte, Parbhani
Tejaswin Shankar : फेडरेशननं डावललं, न्यायालयानं तारलं; तेजस्विन शंकरनं जिंकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com