Vikoli News: क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात रुग्णानं संपवलं जीवन, चार दिवसापूर्वी झाला होता अ‍ॅडमिट
Krantiveer Mahatma Jyotiba Phule Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Vikoli News: क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात रुग्णानं संपवलं जीवन, चार दिवसांपूर्वी झाला होता अ‍ॅडमिट

Bharat Jadhav

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

विक्रोळीत टागोर नगरमध्ये असलेल्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात २६ तारखेला अ‍ॅडमिट झालेल्या गौरव भोसले वय वर्षे ३८ या तरुणाने आज पहाटे रुग्णालयाच्या स्वच्छालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

गौरव भोसले वय वर्ष ३८ हा विक्रोळी टागोर नगरमधील रहिवाशी आहे. त्याला अशक्तपणा आणि जुलाबचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला २६ जूनला विक्रोळी टागोर नगर मधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु आज स्वच्छलयात मृतावस्थेत आढळला.

आज पहाटे गौरव हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये बराच वेळपासून दिसला नाही. त्यानंतर त्याची शोधा शोध रुग्णालयातील कर्मचाऱ्यानी केली. त्यावेळी रुग्णालयाच्या स्वच्छालयात गौरव भोसले या फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती तात्काळ विक्रोळी पोलिसांना रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

सकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस रुग्णालयात दाखल झाले व गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला. अत्यंक्रियेसाठी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आली. आता या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ माजलीय. गौरवने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसून विक्रोळी पोलीस ठाणे याचा तपास करत आहेत.

४० वर्षीय रुग्णाची आत्महत्या

काही दिवसापूर्वी मुंबईतील नायर रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली होती. या रुग्णाने नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अविनाश सावंत असे या आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पाऊसाची दमदार हजेरी; पावसाचा रेल्वेसेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: "ती" वाघनखं महाराजांची नाहीत?

SCROLL FOR NEXT