Vikhroli News Saam Digital
मुंबई/पुणे

Vikhroli News : अडीच तास हल्ला..पोलीस, श्वान पथकालाही 'ग्रेट डेन' आवरला नाही; सांभाळ करणाऱ्याचाच घेतला जीव

Great Dane Dog Attack : विक्रोळी येथील गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या ग्रेट डेन या श्वानाने त्याचा सांभाळ करणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाचा जीव घेतला आहे. जवळपास तीन तास झटापट सुरू होती.

Sandeep Gawade

विक्रोळी येथील गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने त्याचा सांभाळ करणाऱ्याचाच जीव घेतला आहे. हसरत अली बरकत अली शेख (२२) असं या मृत तरुणाचं नाव आहे. गोदरेजमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनी मार्फत ही श्वान सिक्युरिटी देण्यात येते. या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचे काम इथे हसरत अली सारखे तरुण करत असतात.

हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी या कुत्र्याने हसरत अली वर जोरदार हल्ला केला. सुमारे अडीच तास हा हल्ला सुरू होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस , पालिका श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. कुत्र्याला हसरत अली पासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले.

पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता. अडीच ते तीन तासाने या कुत्र्याला हसरत अली पाऊण दूर करून , हसरत अली ला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अतिशय गंभीर जखमा असल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मार्शल डॉग एजन्सी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

SCROLL FOR NEXT