Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बंद इमारतीत आढळला युवकाचा मृतदेह; विक्रोळीमधील खळबळजनक घटना, नागरिकांमध्ये घबराट

Vikhroli Crime News: विक्रोळी पूर्व स्टेशन रोड लगत असलेल्या हरियाली व्हिलेज मच्छी मार्केट मागे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत रखडलेल्या इमारती उभ्या आहेत. येथील पार्किंग झोनमध्ये गढूळ पाणी देखील साचलं आहे.

Ruchika Jadhav

Vikhroli News:

विक्रोळी पूर्व येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन पूर्व रोड परिसरात पडीक इमारतीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमध्ये मृतदेह आढळल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विक्रोळी पूर्व स्टेशन रोड लगत असलेल्या हरियाली व्हिलेज मच्छी मार्केट मागे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत रखडलेल्या इमारती उभ्या आहेत. येथील पार्किंग झोनमध्ये गढूळ पाणी देखील साचलं आहे. या साचलेल्या पाण्यात गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेह पाण्यात असल्याने त्याचा वास परिसरात सर्वत्र पसरला होता. घटनास्थळी अग्निशमन दल व विक्रोळी पोलीस ठाणे पोलीस पोहोचले व या मृतदेहास ताब्यात घेतले आहे. पुढील क्रियेसाठी या मृतदेहास जवळील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याच पाण्याच्या डबक्यात गेल्या वर्षी देखील एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. आता ही दुसरी घटना असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा युवक याच परिसरात राहत असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास विक्रोळी पोलीस ठाणे करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT