Eknath shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : शिंदेंच्या अडचणी वाढल्या, नाराज आमदाराचा घरचा आहेर, अडीच वर्षाचं मंत्रिपद नाकारले

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राचा बिहार होतोय, महाराष्ट्रातही जातीयवादीपणा सुरू असल्याची टीका शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे नाराज आहेत.

Namdeo Kumbhar

Vijay Shivtare News : मंत्रिमंडळ विस्तारात अनेक इच्छुकांच्या पदरी निराशाच आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबल यांनी आपली नाराजी बालून दाखवली होती. आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे आपली नाराजी बोलून दाखवली. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनाही मंत्रि‍पदाने हुलकावणी दिली. विजय शिवतारे यांचेही नाव मंत्रि‍पदासाठी आघाडीवर होते, पण ऐनवेळी त्यांच्या नावावर फुली पडली आहे. शिवतारे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. शेवटपर्यंत माझं नाव हतं. पण ऐनवेळी नाव काट झाले, त्यामुळे नाराज आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने, शिंदेंना घरचा आहेर

मंत्रिमंडळाच्या यादीत शेवटपर्यंत नाव होते. पण ऐनवेळी नाव कट झालं. त्यामुळे नाराजी नक्कीच आहे, असे विजय शिवतारे साम टीव्हीशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात कर्तृत्वावर काम केले, यावर जे सर्व चालायचे ते आता आपण आता बिहारकडे जातोय . बिहार जे आज आहे ते जातीयवादावर राजकारण आहे. आपण सगळे तिकडे जातोय, अशी टीका शिवतारे यांनी केली.

अडीच वर्ष मंत्रिपद घेणार नाही -

मला मंत्रिपद मिळाले की नाही, हे महत्त्वाचे नाही. लोकांची कामे होणे हे महत्त्वाचे आहे. विभागानुसार नेतृत्व दिली जायची. त्यांच्या हातात सत्ता देत, महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. पण आपण बिहारच्या दिशेने जात आहोत. जातीयवादीपणा सुरु आहे, असा हल्लाबोल यावेळी शिवतारे यांनी केला.

मला अडीच वर्ष मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं होतम. कार्यकर्ते गुलाम नाही. अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं तरी मला ते नको, असे म्हणत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. शेवटपर्यंत नाव होतं पण ऐनवेळी नाव कट झालं, त्यामुळे नक्कीच नाराजी आहे. विश्वासात घेऊन सर्व व्हायला हवं होतं, असेही शिवतारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT