Vidyanand Bapat News Saam Tv
मुंबई/पुणे

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट, म्हणाले, "मी फक्त WhatsApp..."

Vidyanand Bapat Social Media Account : पुण्यातील DJ वॉरच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांच्या नावाने Facebook, Instagramवर बनावट खाती तयार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बापट यांनी आपण फक्त WhatsApp वापरत असल्याचे स्पष्ट केले.

Alisha Khedekar

  • पुण्यातील DJ च्या वादादरम्यान विद्यानंद बापट चर्चेत आले

  • बापट यांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट उघडल्याचा दावा

  • ही खाती बनावट असल्याचे स्वतः विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केले

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या मुद्द्यावरून पुण्यात DJ वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. याच DJ वॉरमधून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाती तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाने काही अकाउंट असल्याची चर्चा सुरू असून, या अकाउंटवरून विविध प्रकारचे मेसेज आणि पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकारानंतर स्वतः विद्यानंद बापट यांनी त्यांच्या नावाने सोशल मीडियावर तयार करण्यात आलेली खाती बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

विद्यानंद बापट यांनी म्हटले की, “माझ्या नावाने सर्व खाते बनवत आहेत. सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे कोणी काहीही करत आहे.” तसेच आपण सोशल मीडियावरील इतर कोणतेही प्लॅटफॉर्म वापरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी फक्त व्हॉट्सअॅप वापरतो. इतर कुठलेही सोशल मीडिया साधन मी वापरत नाही,” असे बापट यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण, डीजेचा वाढता आवाज आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास या मुद्द्यांवरून विद्यानंद बापट चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या नावाने सोशल मीडियावर खाती तयार झाल्याने या खात्यांवरून नेमका कोणता मेसेज व्हायरल केला जात आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या नावाने खाते तयार करून त्यावरून पोस्ट किंवा मेसेज व्हायरल केल्यास त्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. विशेषतः एखाद्या संवेदनशील किंवा चर्चेतील विषयाशी संबंधित पोस्ट असल्यास ती व्यक्तीची अधिकृत भूमिका आहे का, याची खात्री करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या खात्यांवरील पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सत्यता तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात गणेश देवरे यांचा खुलासा; आरोप फेटाळले

पत्नीविषयी 'या' 5 गोष्टी प्रत्येक नवऱ्याला माहिती असायला पाहिजेत

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात येणार १४ लाख रुपये, वाचा कॅलक्युलेशन

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT