Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar left for Delhi Big Update on Shivsena mla disqualification case Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? विधानसभा अध्यक्ष तडकाफडकी दिल्लीला; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता अॅक्शन मोडवर आले असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Maharashtra Political Latest News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून अतिशय महत्वाची घडामोडी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता अॅक्शन मोडवर आले असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार अपात्रता कारवाईला वेग आल्याने शिंदे गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे. येत्या एक ते दोन दिवसात राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे.

एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला पर्याय असणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे.

शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT