Sachin Ahir House Burglary Saam TV
मुंबई/पुणे

Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या घरी भयंकर दरोडा! तब्बल ३.५ कोटींचा ऐवज गायब; मुंबईत खळबळ

Sachin Ahir House Burglary: शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या मुंबईतील घरात धाडसी चोरी झाली असून सुमारे ३.५ कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे

Namdeo Kumbhar

Shiv Sena Leader Sachin Ahir : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते, उपसभापतीपती सचिन अहिर यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. या चोरीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी अहिर यांच्या घरावर डल्ला मारत तब्बल ३.५ कोटी रुपयांचा ऐवज लांबवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

नेकी काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने ही चोरी केली. सचिन अहिर यांच्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोकड असा मिळून सुमारे ३.५ कोटींचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.

पोलीस तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील आणि घरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. ही चोरी अंतर्गत माहिती असणाऱ्या व्यक्तीने केली आहे की सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेऊन बाहेरील चोरट्यांनी डल्ला मारला, या दोन्ही दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. सुरक्षेचा कडक पहारा असताना उच्चभ्रू आणि व्हीआयपी (VIP) नेत्याच्या घरी एवढी मोठी चोरी झाल्यामुळे मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी; पक्षप्रमुखांची मोठी कारवाई; इतर नेत्यांमध्ये खळबळ

Homeguard Drivers: होमगार्ड्सच्या हाती पोलीस वाहनांचं स्टेरिंग; २,३०० होमगार्डना दिलं जाणार वाहनचालकाचं प्रशिक्षण

Guava Benefits: सफरचंद खाण्यापेक्षा रोज 'हे' फळं खा; मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रस्त्यांवरून सरकारवर निशाणा; उद्योगांबाबतही गंभीर सवाल

Shiv Sena SC Case Live : आजची सुनावणी संपली, कोर्टानं दिली पुढची तारीख, वाचा युक्तिवादाचा शब्द ना शब्द

SCROLL FOR NEXT