Sharad Pawar and Uddhav Thackeray Maharashtra Politics, Maharashtra Political News in Marathi, Sarkarnama Open Mic Challenge SAAM TV
मुंबई/पुणे

विधान परिषदेत कोण उधळणार गुलाल? दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक!

विधान परिषद निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषद निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Vidhan Parishad Election 2022 Mahavikas Aghadi latest News)

या बैठकीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते तसेच मंत्री या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यसभेत झालेल्या पराभवाचा वचपा आघाडी सरकार विधान परिषदेत काढण्याचा प्रयत्न करेल.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. अशातच सहावी जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचा मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न असेल. विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT