Maharashtra Assembly Session 2022: विधान भवनात प्रचंड गदारोळ, राज्यपाल अभिभाषण न करताच निघाले Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Session 2022: विधान भवनात प्रचंड गदारोळ, राज्यपाल अभिभाषण न करताच निघाले

आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणावर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळी प्रचंड गदारोळ झालेला बघायला मिळाला आहे. या गोंधळामुळे राज्यपालांनी (Governor)आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिले आहेत.

हे देखील पहा-

विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहात घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधामध्ये सत्ताधारी पक्ष विधीमंडळामध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आले आहेत.

या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सांगितले आहे की, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याविषयी त्यांना माफी मागावी लागणार आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसं नाही. याविषयी भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT