Latur: महावितरणाच्या गलथान कारभाराचा शॉक; शेतकऱ्यांचा 11 एकर ऊस जळून खाक

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथील 5 शेतकऱ्यांचा 11एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाला
Latur: महावितरणाच्या गलथान कारभाराचा शॉक; शेतकऱ्यांचा 11 एकर ऊस जळून खाक
Latur: महावितरणाच्या गलथान कारभाराचा शॉक; शेतकऱ्यांचा 11 एकर ऊस जळून खाकदीपक क्षीरसागर
Published On

लातुर: लातूर जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यातील हलगरा (Halgara) येथील ५ शेतकऱ्यांचा (farmers) ११ एकर ऊस (Sugarcane) महावितरणच्या (MSEDCL ) हलगर्जीपणामुळे जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना १५ लाखांचा फटका बसला आहे. निलंगा (Nilanga) तालुक्यातील हलगरा गावातील (village) अनिता गायकवाड याचे ३ एकर, श्रीमंत गायकवाड यांचे २ एकर, झटिंगराव गायकवाड याचे ३ एकर, बालाजी गायकवाड याचे २ एकर तर गोविंद गायकवाड याचे २ एकर ऊस जळून खाक झाला आहे. (Latur MSEDCL Farmers burn 11 acres of sugarcane)

हे देखील पहा-

यामध्ये ५ शेतकऱ्यांचे किमान 15 लाखांचे नुकसान झाले आहे महावितरण (MSEDCL) कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अगोदच बारा- पंधरा महिने होऊन गेले तरी कारखाना ऊस घेऊन जात नाही. यामुळे शेतकरी (Farmers) त्रस्त असताना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे साधारणत: १५ लाख रुपयाचा ऊस जळाला आहे.

Latur: महावितरणाच्या गलथान कारभाराचा शॉक; शेतकऱ्यांचा 11 एकर ऊस जळून खाक
आरबीआयची मोठी कारवाई: सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द

यापुर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या तरीसुद्धा वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.या घटनेमुळे शेतक-यांत संतापाची लाट उसळली आहे. याबाबत अभियंता खामकर म्हणाले की, घटनेची माहिती उशिरा समजली आहे. अंधार पडल्यामुळे उधा घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com