Political News  Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन नितेश राणे-अबू आझमींमध्ये बाचाबाची; विधीमंडळाच्या आवारातील व्हिडीओ आला समोर

लव्ह जिहादची प्रकरण खोटी असल्याच सांगत मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आमदार अबू आझमी यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : लव्ह जिहादचा मुद्दा विधीमंडळात गाजल्यानंतर आज विधीमंडळाच्या आवारातही याबाबत खुलेआम चर्चा झाला. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायलं मिळालं.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात लव्ह जिहादची १ लाख प्रकरण असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी आज माहिती दिली. त्याचवेळी विधान भवनाच्या आवारात आमदार अबू आझमी आले.

लव्ह जिहादची प्रकरण खोटी असल्याच सांगत मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आमदार अबू आझमी यांनी म्हटलं. यावरुन नितेश राणे आक्रमक झाले आणि पत्रकार परिषदेला या असं आझमी यांना म्हणाले. (Latest News Update)

तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, असं नितेश राणे म्हणाले. तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असंही नितेश राणेंनी म्हटलं. त्यावर अबू आझमी यांनी असं काही नाही हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.

नितेश राणेंनी यावेळी अनधिकृत मदरशांचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम पाडलं पाहिजे असं मत मांडलं. मात्र कारवाईसाठी गेल्यास हत्यारं काढली जातात, असं नितेश राणेंनी म्हटलं. त्यावर अबू आझमी यांनी म्हटलं की, हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT