Anil Parab News: अनिल परब यांना मोठा दिलासा; अटकेच्या कारवाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचे EDला आदेश

Dapoli Sai Resort Case: दापोलीच्या मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई हायकोर्टानं अनिल परब यांना मोठा दिलासा दिला आहे.
Anil Parab On Dapoli Sai Resort in Bombay High Court
Anil Parab On Dapoli Sai Resort in Bombay High CourtSAAM TV

Sai Resort : दापोलीच्या मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक केली असतानाच, मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा दिला आहे. परब यांच्याविरोधात कुठलीही 'सक्ती'ची कारवाई केली जाऊ नये, असे आदेश हायकोर्टाने ईडीला दिले आहेत.  (Latest Marathi News)

दापोलीमधील मुरूड येथील साई रिसॉर्टशी (Dapoli Sai Resort scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून (ED) आधी सदानंद कदम आणि त्यानंतर तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

Anil Parab On Dapoli Sai Resort in Bombay High Court
Hasan Mushrif News : हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा, तूर्तास अटक टळली; कोर्टाचे आदेश काय?

दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या प्रकरणात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ईडीने त्यांच्याविरोधात नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

मुंबई हायकोर्टात आज, मंगळवारी परब यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. ईडीने सोमवारपर्यंत अनिल परब यांच्याविरोधात कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

Anil Parab On Dapoli Sai Resort in Bombay High Court
Sadanand Kadam: मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ४ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

सदानंद कदमांनंतर जयराम देशपांडेंनाही अटक

दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम आणि त्यानंतर मंगळवारी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली.

साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com