Dive Ghat Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Dive Ghat Pune : पुण्यातील दिवे घाटात दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला अन्....पाहा VIDEO

Leopard Viral Video: दिवेघाटात प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वडकी ग्रामस्थांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव- साम टिव्ही,पुणे

पुण्यातील प्रसिद्ध सासवड रोडवर असलेल्या दिवे घाटात काल बिबट्या रस्त्यावरुन जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमझ्ये बिबट्या रस्त्याच्या मधून जात असल्याचं दिसत आहे. याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एक जखमी बिबट्या रस्त्याच्या मधोमध बसला होता. या घटनेनंतर वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात असून स्थानिक ग्रामस्थांकडूना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

दिवे घाटातल्या कालचा व्हायरल होत असलेल्या बिबट्याच्या व्हिडिओसंबंधित अशीबी माहिती मिळते की, ता.५ जुलै २०२४ रोजी दिवे घाटात प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. मात्र ५ जुलैच्या काही दिवसांपासून बिबट्या(leopard) दिसत असल्याचेही अनेकांकडून सांगण्यात येत होते मात्र त्यावेळी कोणाकडे असा फोटो किंवा चित्रीकरण आढळले नाही.तरीही ग्रामस्थ सावधगिरी बाळगून होते.

मात्र काल सासवडकडून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या डोंगरावरून उतरून अचानक झाडांमध्ये जाताना वडकीतील नागरिकांना दिसला.बिबट्या रस्ता (road) ओलांडताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने प्रवाशांमध्ये घबराट झाली.त्याच वेळेस मोबाईलमध्ये व्हिडीओ केला तो आता व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील '@mrbeen979619'वरही शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधीही पुण्यातील दिवे घाटात बिबट्या दिसून आल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.मात्र बिबट्या दिसल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT