Mumbai Malad Fruit Seller Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Malad Fruit Seller : फळांना लावलं जातंय उंदीर मारण्याचं औषध, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; संतापजनक Video व्हायरल

Mumbai Malad Fruit Seller Viral Video : मालाड परिसरात फळांवर उंदीर मारण्याचे विषारी औषध लावून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून पोलिसांनी दोन विक्रेत्यांना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • मालाडमध्ये विषारी औषध लावून फळ विक्रीचा धक्कादायक प्रकार

  • व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई, दोन विक्रेते अटकेत

  • महापालिकेकडून बेकायदेशीर दुकानावर बुलडोझर कारवाई

  • नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता

संजय गडदे, मुंबई

मालाड परिसरातून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेली धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळांना उंदीर लागू नयेत म्हणून त्यावर उंदीर मारण्याचे ‘राटोल’ हे विषारी औषध लावून तीच फळे नागरिकांना विक्रीस ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दोन फळ विक्रेत्यांना अटक केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये संबंधित विक्रेता फळांवर उंदीर मारण्याची क्रीम लावताना स्पष्ट दिसत होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या फळांचे सेवन केल्यास उलट्या, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर निकामी होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

घटनेची माहिती मिळताच मनसे नेते कुणाल साळुंके आणि मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विक्रेत्यांना जाब विचारला. यावेळी संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित विक्रेत्याला ‘मनसे स्टाईल’ने मारहाण केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी तात्काळ कारवाई करत मनोज कुमार केसरवाणी आणि बिपीन केसरवाणी या दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी “उंदीर फळे खातात, म्हणून त्यावर औषध लावत होतो,” अशी कबुली दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 125, 274, 275 आणि 286 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने संबंधित विक्रेत्याचे बेकायदेशीर दुकान जमीनदोस्त केले आहे. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने जप्त केले आहेत. दरम्यान, मालाड पोलिसांनी परिसरातील इतर फेरीवाल्यांचीही चौकशी सुरू केली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची निर्घृण हत्या, बायकोला संपवून नवऱ्याने केली आत्महत्या

Maharashtra News Live Update : शेगाव येथील चिंचोलीजवळ शेतातील चारा कुटाराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Long Hair Tips: 1 महिन्यातच केस दुपटीने वाढतील, रोज रात्री कांदा आणि नारळाचा 'हा' तेल लावा

जम्मू-श्रीनगर आता फक्त काही तासांत! वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, कसा असणार मार्ग आणि वैशिष्ट काय?

SCROLL FOR NEXT