Video Saam Digital
मुंबई/पुणे

Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले ५ जण गेले वाहून, ४ मुलं आणि एका महिलेचा समावेश; पाहा अंगावर काटा आणणारा Video

Sandeep Gawade

भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेली १ महिला आणि ४ मुलं बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. धरण परिसरातील धबधब्यावर गेले असताना तोल जाणून धबधब्यात पडले आणि वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोणावळा पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून मुंबई परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर कपाऱ्यांवरील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. लोणावळा हे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. दरम्यान लोणावळ्यातील भुशी डॅमवर आजच ओव्हर फ्लो झालं होतं. त्यामुळे पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे.

दरम्यान आज पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आलं होतं. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले होते. त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. महिला आणि एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. इतर ३ मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

अन्सारी कुटुंब भुशी डॅमजवळील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते बघता बघता पाण्यात वाहून गेले. तेथे उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी वेळ खूप कमी होता. काही क्षणात ते दिसेनासे झाले. दरम्यान या दुर्घटनेनंतर 36 वर्षीय महिला, एक 13 वर्षीय आणि एका 8 वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय 9 वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : वंदे भारत, राजधानी, शताब्दीपेक्षा 'या'ट्रेनचं भाडे दीडपट जास्त

Assembly Election: विधानसभा निवडणुकांनंतर NDAला हादरा! नितीश कुमार देणार 'जोर का झटका', नेमकं राजकारण काय?

Marathi News Live Updates : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

SCROLL FOR NEXT