Vice President Election 2025: NCP leader alleges BJP votes split, not INDIA bloc’s. Saamtv
मुंबई/पुणे

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

NCP Leader On Vice President Election : उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपची मते विभागली गेली, इंडिया ब्लॉकची नाही असा दावा शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतात. सीपी राधाकृष्णन अतिरिक्त मतांनी विजयी झाले. ज्यामुळे क्रॉस-व्होटिंग वाद निर्माण झाला.

Bharat Jadhav

  • उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी.

  • इंडिया आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा कमी मतं.

  • इंडिया आघाडी नव्हे तर भाजपची मतं फुटली. राष्ट्रवादी नेत्याचा दावा.

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालाय. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत ७६७ खासदारांनी मतदान केले. इंडिया आघाडीच्या उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना कमी मतं मिळाली. तर राधाकृष्णन यांना जास्तीची १५ मते मिळाली. या मतदानावेळी इंडिया आघाडीची मते फुटल्याचं सांगितलं जात आहे. पण शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनी वेगळाचा दावा केलाय.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे नव्हे तर भाजपचीच मत फुटली असल्याचा दावा शशिकांत शिंदे यांनी केलाय. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय. भाजप पाशवी सत्तेच्या भरवशावर विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करतेय. मात्र विरोधक भाजपला घाबरत नाही असं शिंदे म्हणालेत.‌ त्यामुळेच भाजपचीच काही मतं या निवडणुकीत फुटल्याचा शशिकांत शिंदे म्हणालेत.

दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेवळी इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आलंय. एनडीएकडे एकूण ४२७ खासदार होते. मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या ११ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केलं. त्यामुळे हा आकडा ४३८ पर्यंत पोहोचला. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण ४५२ मते मिळाली, याचाच अर्थ १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली.

याच कारणामुळे बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३१४ मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना ३०० मते मिळाली. खासदार नरेश म्हस्के यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना कोणाची अतिरिक्त मते मिळाली याचा खुलासा केला होता. एनडीएच्या उमेदवाराला काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या खासदारांनी मतदान केल्याचा खुलासा म्हस्के यांनी केला होता.

आता शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वेगवेगळाचा दावा केलाय. इंडिया आघाडीचे मतं फुटली नाहीत, तर भाजपच्या खासदारांची मतं फुटल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान, अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होताय. यावरून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केलीये. कुर्डू प्रकरणात अजित पवारांची भाषा चुकीचीच होती. अशा भाषेमुळे तरुण अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत असल्याचं शशिकांत शिंदे म्हणालेत. त्यामुळे रोहित पवारांनी काय भूमिका मांडली आपल्याला माहित नाहीये. मात्र आपण यावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडत असल्या तर शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT