माजी मंत्री, ज्येष्ठ नेत्या शालिनी पाटील यांचं मुंबईत निधन
शालिनीताई पाटील यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ
शालिनी पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार होणार
माजी मंत्री शालिनी पाटील यांचं निधन झालं आहे. शालिनी पाटील यांनी माहिम येथील राहत्या घरी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शालिनी पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील कोरेगावात अंत्यसंस्कार होणार आहेत. शालिनी पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या मुंबईतील माहीम येथे वास्तव्यास होत्या. त्यांचं आज शनिवारी माहिम येथील राहत्या घरी निधन झालं. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शालिनीताई पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे.
शालिनी पाटील यांनी राज्यात मंत्रिपद आणि आमदार पद भूषवलं आहे. त्या सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून राज्यात प्रसिद्ध होत्या. त्या मराठा आरक्षणाच्या समर्थक होत्या. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला होता. मात्र, त्यांना राजकीय नेत्यांची हवी तशी साथ मिळाली नाही.
दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या एका भाषणात त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील राजकारणातील वाघीण असा केला होता.साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेचा दर्जा दिला होता.
शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार म्हणाले, माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांचं निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या मतं मांडताना कधीही कचरत नसायच्या. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने "शरदचं नेतृत्व मान्य करा." हा वसंतदादा पाटील यांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.