Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Versova Beach News: समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेलं जोडपं भरती प्रवाहात अडकलं; पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Versova Cops Rescue Couple at Beach: सुदैवाने या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी या जोडप्याचा जीव वाचवला.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईच्या विविध चौपाटींवर बुडून आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालेला आहे. अशातच मुंबईच्या प्रसिद्ध वर्सोवा चौपाटीवर फिरण्यासाठी आलेले जोडपे समुद्राला आलेल्या भरती प्रवाहात अडकून राहिले. मात्र सुदैवाने या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी या जोडप्याचा जीव वाचवला. (Latest Marathi News)

वर्सोवा चौपाटीवर फिरण्यासाठी जोडपं आलं होतं. हे जोडपं मद्यधुंद होतं. या चौपाटीवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना भरतीच्या पाण्यात आणि ट्रायपॉड दगडांमध्ये अडकलेले जोडपे दिसून आले. त्यावेळी या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून या जोडप्याला सुरक्षित बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

दोन दिवसापूर्वी मुंबईच्या वर्सोवा चौपाटीवर एक मद्यधुंद जोडपं फिरण्यासाठी आले. दोघेही किनाऱ्यावरील ट्रायपॉड दगडांमध्ये गप्पा मारत बसले होते. दोघे जोडपे गप्पा मारत असताना सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली. त्यानंतर भरतीचे पाणी किनाऱ्यावर असलेल्या ट्रायपॉड दगडांवर आदळू लागले.

यामुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या जोडप्याला बाहेर पडणे अवघड झाले. ही गोष्ट येथील एका पर्यटकांनी गस्तीवर असलेल्या वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना सांगितली. त्यांनी त्वरित वर्सोवा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्या मद्यधुंद जोडप्याला सुरक्षित बाहेर काढले.

वर्सोवा पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून नागरिकांना समुद्रात जाऊ नये, अशा सूचना केल्या जात आहेत.

अन् तरुण ओढ्यामध्ये वाहून गेला

मुंबईतील बोरीवली नॅशनल पार्कमध्ये अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. निसर्गरम्य ठिकाणी ओढा देखील आहे. या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. नॅशनल पार्कमध्ये मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला एक तरुण ओढ्यामध्ये वाहून गेला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंदन दिलीप शाहा असं ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT