Nilam Gorhe_Gopichand PAdalkar Saam TV
मुंबई/पुणे

Nilam Gorhe Vs Gopichand Padalkar News : मार्शल बोलावून गोपीचंद पडळकरांना बाहेर काढावं लागेल, नीलम गोऱ्हे संतापल्या; सभागृहात नेमकं काय झालं?

Political News : इतर आमदारांनी मागणी केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांना या सर्वाबद्दल दिलगिरीही व्यक्त करावी लागली.

सूरज सावंत

Mumbai News : विधानपरिषेदेच्या बोलण्याच्या वेळेवरुन उपसभापती नीलम गोऱ्हे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आहे. भाषण संपवण्याची सूचना दिल्यावरुन संतापलेल्या गोपीचंद पडळकर यांनी उपसभापतींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पडळकर यांना चांगलंच झापल्याचं दिसून आलं. अखेर इतर आमदारांनी मागणी केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांना या सर्वाबद्दल दिलगिरीही व्यक्त करावी लागली.

नेमकं काय झालं?

आमदार गोपीचंद पडळकर आपल्या विभागातील प्रश्नांबाबत विधानपरिषदेत बोलत होते. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी त्यांना आपलं म्हणणं थोडक्यात मांडण्याची सूचना केली. यावरून गोपीचंद पडळकर यांनी इतर सभासदांना दिल्या जाणाऱ्या अधिकच्या वेळेचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केला. दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली.

असं तुम्ही करु शकत नाही बऱ्याचदा तुम्ही असं करता. तुम्हाला ताकीद देखील मिळाली आहे, नीलम गोऱ्हे असं म्हणताच पडळकर यांचा पारा चढला आणि त्यांनी काय ताकीद देताय. निषेध करतो मी असं म्हणत सभागृहातच हातातले पेपर फाडले. (Political News)

नीलम गोऱ्हे यांनीही इथे धमक्या देऊ नका, तुम्ही अत्यंत चुकीचे वर्तन केले असं म्हटलं. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गोपीचंद पडळकर यांना असं करु नका. उपसभापतीपदाचा मान राखा, असं म्हटलं. दरम्यान इतर सभासदांनी केलेल्या मागणीनंतर हे विधानपरिषदेच्या रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलं आहे.  (Latest News)

मार्शलला बोलावून बाहेर काढावे लागेल

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, तुम्ही माझा निषेध केला ते मी सभागृह कामकाजातून काढून टाकते आणि तुम्ही जे वर्तन केले आहे, त्यामुळे उद्या तुम्हाला दिवसभर सभागृहात बोलू देणार नाही. तुम्हाला हे मान्य करावं लागेल, हा माझा निर्णय आहे. (Maharashtra News)

तुम्ही फक्त माझा अपमान नाही तर या चेअरचा अपमान केला आहे. हा संपूर्ण सभागृहाचा अपमान आहे याची तुम्हाला जाणीव नाही. शांत अन्यथा तुम्हाला मार्शलला बोलावून बाहेर काढावे लागेल. इतर सभासदाच्या आक्रमक पवित्र्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी चेअरचा मान राखून दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT