Prakash Ambedkar  Saam tv
मुंबई/पुणे

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबईतील आप आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

Prakash Ambedkar News : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. देशात कमी वेळात राजकारणात स्थान भक्कम करणाऱ्या आप पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईतील आप आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे आणि केजरीवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, 'बऱ्यात ठिकाणी चर्चा चालू आहे. मध्यांतरी तेलगंणाचे मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली होती. आता केजरीवाल करत आहे. माझं जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे'.

'आता सर्व राजकीय पक्षांना जाणीव होत आहे की, शासनाचा राजकीय पक्षात हस्तक्षेप आता वाढलेला आहे. शिवसेनेचा (Shivsena) जो निर्णय आला, त्यांच्यातून हे दिसतं. सुप्रीम कोर्टाने जसं म्हटलं की निवडणूक आयोगाने निकालावर आम्ही आता काही करणार नाही. मला वाटतं संविधानाला हे धरून नाही', असे पुढे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर नामकरणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद हाय कोर्ट नाव तसेच ठेवले आहे. ज्या दिवशी औरंगाबाद हायकोर्ट नाव बदलेल, तेव्हा औरंगाबादचा नाव बदललं असं मी मानणार आहे'.

भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मुस्लिम समाजामध्ये राजकीय नेता नाही. २०२४ ची निवडणूक जवळ येईल आणि निकाल जेव्हा भाजपाच्या विरोधात असेल, तेव्हा समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे'. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर काय मिळतंय, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संविधान बदलण्याचे पाप काँग्रेसने केलं, नितीन गडकरी संतापले

Maharashtra News Live Updates: रिझर्व्ह बॅकेला धमकी वजा फोन

Tube Tunnel : आता भारताशी नडण्याआधी चीन १० वेळा विचार करेल, लेह ते पँगाँग उभारला जाणार आठ किमीचा ट्यूब टनल

Viral Video: चंद्रा गाण्यावर आजपर्यंत खूप नाचले; पण असा डान्स पाहिलाच नसेल, Video बघून कौतुक करताना थकणार नाहीत!

Navneet Rana News : नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, खुर्च्या फेकल्या, ४५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT