Vashi Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Vashi Attack On Boy: प्रेमसंबंधाला विरोध, भावाचा बहिणीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला

Navi Mumbai Crime News: याप्रकरणी वाशी पोलिसांनी (Vashi Police) दोन तरुणांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.

Priya More

Vashi Crime News: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वाशीमध्ये (Vashi) तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध करत भावाने बहिणीच्या प्रियकरावर धारधारशस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी (Vashi Police) दोन तरुणांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निजामूद्दीन खान असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हसन सिद्दीकी आणि युसूफ शहा यांनी निजामूद्दीनवर जीवघेणा हल्ला केला. वाशी रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत सर्विस रिव्हॉल्वरचा धाक दाखवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

निजामुद्दीन खानचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. यालाच विरोधत असल्याने आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. निजामुद्दीनला वाशी रेल्वे स्थानक परिसरात गाठून त्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. घटनास्थळावर असलेल्या रघुराम पै हे निजामुद्दीनच्या मदतीसाठी आले पण आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यात ते देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांना निजामुद्दीनला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.

पोलिसांनी रिव्हॉल्वर दाखवताच आरोपी त्यांच्या शरण आले. दोन्ही आरोपी रस्त्यावर पडून पोलिसांना बेड्या घाला असे सांगत होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे वाशी रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

SCROLL FOR NEXT