MNS Saam TV
मुंबई/पुणे

...म्हणून वसंत मोरेंनी राजीनामा दिला, मनसेच्या नव्या शहराध्यक्षांनी सांगितलं कारण

'पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरेंना राज ठाकरेंनी मुंबईत बोलावलं नाही, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, ते कारण खोटं'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली म्हणून वसंत मोरे (Vasant More) यांना पुणे मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला अशा चर्चा सुरु असतानाच आजच पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारलेले नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी वेगळच कारण सांगितलं आहे.

ते म्हणाले, 'पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी मुंबईत बोलावलं नाही. अशी चर्चा सुरु आहे मात्र, ते कारण खोटं असून वसंत मोरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची जबाबदारी मला दिली असल्याचं साईनाथ बाबर यांनी सांगितलं ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे देखील पहा -

तसंच बाबर पुढे म्हणाले, 'राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्याने आनंद वाटतो. राज ठाकरेंनी काल फोन करून बोलावलं, आज जबाबदारी दिली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कांग्रेस यात राजकारण करण्याच काम करत आहे. वसंत मोरेंना भेटून आलो आहे आता मोरे माझ्यासोबत काम करणार आहेत असंही बाबर यांनी यावेळी सांगितलं. तर येत्या १५, १६, १७ तारखेला राज ठाकरे पुण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT