Vasant More Saam TV
मुंबई/पुणे

Vasant More FB Post: क्या बोलती पब्लिक? वसंत मोरे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात? FB पोस्टवरून चर्चेला उधाण

Vasant More FB Post: मनसे नेते वसंत मोरे यांनी पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एफबी पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Vishal Gangurde

Pune News: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. अशातच मनसे नेते वसंत मोरे यांनी पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एफबी पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून पोटनिवडणुकीची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे १९ लाख ७२ हजार आहे.

मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची स्थान निश्चिती करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकहून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुण्यात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपच्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहे. या जागेसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

तर महाविकास आघाडीत पुणे लोकसभा निवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. अशातच मनसेने देखील या राजकारणात उडी घेतली आहे.

पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी देखील इच्छा व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक एफबी पोस्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

वसंत मोरे यांनी फेसबुकवर मनसेच्या एका फेसबुक ग्रुपवरील एका पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये लिहिले आहे की,'पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली तर लिहून ठेवा, राज्यभरातून मनसे कार्यकर्ते प्रचारासाठी पुण्यात येतील'.

वसंत मोरे यांनी हा स्क्रिनशॉट फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टवर त्यांच्या समर्थकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वसंत मोरे यांच्या एका समर्थकाने पोस्टवर म्हटले आहे की, 'तुम्ही निवडणूक लढवा. आम्ही तुमच्या पाठिशी आहेत. तुमच्यासारखा प्रतिनिधी मिळणे हे भाग्य आहे'.

या पोस्टच्या माध्यमातून वसंत मोरे यांची पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टनंतर त्यांचा पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT