vasant more and ravindra dhangekar Saam tv
मुंबई/पुणे

Pune Lok Sabha : झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन! पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर उमेदवारांमध्ये खमंग चर्चा

vasant more and ravindra dhangekar latest news : वाडेश्वर कट्ट्यावर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांची खमंग चर्चा झाल्याचे दिसून आली. यावेळी दोघांनी खासदार होण्याचा दावा केला.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे :

पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे शरद मोहोळ आणि 'वंचित'चे वसंत मोरे यांची प्रमुख लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात एकूण ५१.२५ टक्के मतदान झालं. पुण्यात यादिवशी मोठा हायव्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला. या मतदानानंतर 'झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन, अशी भूमिका राजकीय नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

मतदानाच्या दोन दिवसानंतर पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय विरोधक उमेदवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या कट्ट्यावर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांची खमंग चर्चा झाल्याचे दिसून आली. यावेळी दोघांनी खासदार होण्याचा दावा केला.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी हजेरी लावली. रवींद्र धंगेकर यांनी मोठा दावा केला.

रवींद्र धंगेकरांनी केला मोठा गौप्यस्फोट

'राहुल गांधी सभेला आले, त्यावेळी राहुल गांधी यांनी खांद्यावर हात टाकत म्हणाले की, पुढच्या महिन्यात संसदेत भेटू, असं सांगून राहुल गांधी गेले. त्यामुळे मला विश्वास आहे. जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे. निकालानंतर पाहू, असं धंगेकरांनी सांगितलं. भाजपकडून माझं घर उद्ध्वस्त केलं जाणार होतं, असा गौप्यस्फोट धंगेकरांनी केला.

वसंत मोरेंनी केला मोठा दावा

वाडेश्वर कट्ट्यावर वसंत मोरे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी वसंत मोरे यांनी चार लाख लीड मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मलाच माझं मतदान करता आलं नाही, तरीही पुणेकरांनी मला स्वीकारलं आहे. मीच खासदार होणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून पोस्टर लागले आहेत, तो त्यांचा अतिआत्मविश्वास आहे, वसंत मोरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime News: आई घरी नसताना मुलीला बनवायचा वासनेचा बळी; नराधम बापाला आजीवन कारावास

Nanded News: नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; २ तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेलं, खळबळजनक VIDEO

Maharashtra Live News Update: बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचं नागपुरात ढोल ताशाचा गजरात स्वागत

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?

Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT