CM Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपला धक्का, ठाकूर यांची 'बविआ' ८५ जागांवर आघाडीवर

Vasai-Virar Corporation Election Result: वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीचा निकाल काही वेळात लागणार आहे. मतमोजणी सुरू असून भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. ठाकूर यांची 'बविआ' ८५ जागांवर आघाडीवर आहे.

Priya More

Summary -

  • वसई-विरार महापालिकेची मतमोजणी सुरू

  • बहुजन विकास आघाडी ८५ जागांवर आघाडीवर

  • भाजप २६ जागांवर पिछाडीवर

  • शिंदे गट आणि राष्ट्रवादी खाते उघडण्यात अपयशी

वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. सध्या मतमोजणी सुरू असून हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी या पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार आघाडीवर आहेत. बहुजन विकास आघाडी भाजपला काँटे की टक्कर देताना दिसत आहे. बहुजन विकास आघडीचे ८५ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीचे ८५ उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे २६ उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाचा १ उमेदवार आघाडीवर आहेत. महत्वाचे म्हणजे वसई-विरारमध्ये शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन विकास आघाडी एकाही जागेवर आघाडीवर नाही.

वसई-विरार महानगर पालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. ही निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने जोरदार ताकद लावली. भाजपने निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार उभे केले. सध्या मतमोजणी सुरू असून बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये आघाडी-पिछाडी सुरू आहे.

वसई विरार महापालिकेत २९ वॉर्ड असून ११५ सदस्य संख्या आहे. यापैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर ५७ जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ५ आणि अनुसूचीत जमातीसाठी ५ जागा आहेत. तर यात प्रत्येकी २ महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच ७४ जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT