वसई-विरारमधून लाचेचा प्रकार उघडकीस
कर्मचाऱ्याला १० हजारांची लाच घेताना अटक
एसीबीने कर्मचाऱ्याला अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ
मनोज तांबे, साम टीव्ही
मुंबईच्या वांद्रे भागात असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकावर लाच प्रकरणी केलेली कारवाई ताजी असताना वसई-विरारमधूनही धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. १० हजारांची लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याने एसीबीने अटक केली आहे.
दिलीप लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली. लोखंडे हा सध्या एसीबीच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने लाच नेमक्या कोणत्या कामासाठी स्वीकारली होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एसीबीकडून चौकशी झाल्यानंतर या प्रकरणाची अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. पालिका कर्मचारी असलेल्या दिलीप लोखंडे याला अटक केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचे प्रकरणे वाढल्याने नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
मुंबईत RTO विभागातील लिपिकाला अटक
मुंबईच्या आरटीओ विभागातील वरिष्ठ लिपीकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लिपीकाला अटक करताच आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाच घेतल्याप्रकरणी लिपिकाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या बसवर आरटीओने तब्बल २६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कमी करण्यासाठी तक्रारदाराला लिपिक मिथुन आडे याने लाचेची मागणी केली. लिपिकाने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. पुढे तक्रारदार ४ हजार रुपये लाच देताना वरिष्ठ लिपीक रंगेहाथ सापडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.