vasai news, traffic cops saves life of three near bhoidapada vasai saam tv
मुंबई/पुणे

Vasai News: भोईदापाडात पाेलिसांची जिगरबाज कामगिरी, पेटत्या कारमधून तिघांना काढलं बाहेर

दाेन्ही पाेलिसांचे समाज माध्यमातून काैतुक हाेत आहे.

चेतन इंगळे

Vasai News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे जळणा-या कारमधून तीन जणांचे प्राण वाचविण्यात पाेलिसांना यश आले आहे. ही घटना वसईतील भोईदापाडा (vasia bhoidapada) येथे घडली. या घटनेत कार संपुर्णत: जळून भस्मसात झाली आहे. या घटनेतील तिघांचे प्राण वाचविणा-या पाेलिसांचे समाज माध्यमातून काैतुक हाेऊ लागले आहे. (Maharashtra News)

वसई रेंज नाका येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार सुनील खरात (traffic police sunil kharat), रामदास पाटील (traffic police ramdas patil) हे दोघे कर्तव्य संपवून घरी जात असताना मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास कारला भीषण आग लागली. याची माहिती पाेलिसांना मिळताच त्यांनी परतीचा मार्ग स्विकारात तातडीने हालचाली केल्या.

वाहन चालक हस्तीमल बोराणा चिंचोटी फॅक्टरी मधून मधुबनच्या दिशेने जात असताना भोयदा पाडा येथील टाटा शोरूमच्या समोर कारने पेट घेतला. बाेनेट मधून अचानक माेठ्या प्रमाणात धूर येऊ लागला.

यावेळी पोलीस हवालदार सुनील खरात आणि रामदास पाटील यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ माहिती दिली. यावेळी पाेलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कार मधील तिघांना बाहेर काढले.

त्यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान तत्काळ घटनास्थळी आल्याने कारवरील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कार संपुर्णत: जळाली मात्र पाेलिसांच्या सतर्कतेने तिघांचा जीव वाचला. यामुळे पाेलिसांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

SCROLL FOR NEXT