Vasai News Saam tv
मुंबई/पुणे

Vasai News: वसईत गॅस गळती, एकाच घरातील तिघांचा मृत्यू

gas leak in vasai : वसई पश्चिममधून मोठी घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, वसई

Vasai Latest News:

वसई पश्चिममधून मोठी घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झाल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. (Latest Marthi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरातील नौपाडा येथील आशा सदन नावाची दुमली इमारत आहे. रविवारी दुपारी या इमारतीमधून एका घरातून गॅसचा वास येऊ लागला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी घराचे दार तोडून उघडल्यानंतर तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले. यापैकी हॉलमध्ये दोन मृतदेह तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसईतील तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव मोहम्मद आझम असे त्याचं नाव आहे. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. घरातील गॅस सुरू होता. त्यामुळे गॅस गळतीमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली.

'घराचा पंचनामा केला आहे. प्रथमदर्शनी कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटत नाही. गॅस सुरू असल्याचे दिसून आले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, असे ते म्हणाले.

'गॅस सुरू राहिला असावा. त्यामुळेच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली. मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला आहे. हे सर्व उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT