Vasai Shocking Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : निष्ठूर शिक्षिका, अघोरी शिक्षा; 100 उठाबशा बेतल्या चिमुकलीच्या जीवावर, VIDEO

Vasai Shocking : शाळेत केलेल्या शिक्षेमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय.. मात्र शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थिनीला कोणती शिक्षा दिली होती? आणि विद्यार्थिनीचा कोणत्या कसा मृत्यू झाला? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Snehil Shivaji

जर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवून घरी निर्धास्त बसत असाल तर आताच उठा. आणि आपल्या मुलांसोबत बोला. कारण त्यांना विद्या देणारे शिक्षक हे कधी किती निष्ठूर होतील हे सांगता येत नाही.

रडून रडून या आईचे अश्रू कोरडे झालेत .वसईतील सातिवलीतल्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेमध्ये एका शिक्षिकेनं सहावीत शिकणाऱ्या काजल गौंड नावाच्या विद्यार्थीनीला दिलेली शिक्षा तिच्या जीवावर बेतलीय. शाळेत यायला उशीर झाल्यामुळे शिक्षकीने तिला उठाबशा काढायची शिक्षा दिली. एक दोन नाही तर पाठीवर बँग घेऊन या चिमुरडीनं १०० उठाबशा काढल्यानं तिच्या पाठीत जबरदस्त वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तब्येत अधिक बिघडल्यानं तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे मुलीच्या प्रकृतीने उपचारांना साथ दिली नाही आणि राष्ट्रीय बालदिनीच तिनं अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी शाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित होतायेत.

मुळातच मुलांना अशी अघोरी शिक्षा देण्याचे अधिकार शिक्षकांना कोणी दिले. जर शिक्षा दिल्यानंतर मुलांना त्रास होत असेल तर शाळा प्रशासनानं तिच्या पालकांना या शिक्षेबद्दल माहिती का दिली नाही, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज डिलीट का करण्यात आले.

मुलांना अशी अघोरी शिक्षा देणारी शिक्षिका अद्याप मोकाट का? पोलिस आणि स्थानिक प्रशासन या शाळेवर नेमकी काय कारवाई करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून आहे. मात्र एका शिक्षिकेनं केलेल्या एका शिक्षेमुळे एका कुटुंबाचे स्वप्न आणि एका चिमुरडीची आज माती झाली इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळला

Maharashtra Politics : शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाणार नाही; बड्या नेत्याचा दावा

वाळू उपसण्यासाठी जिलेटीनचा वापर! रेती माफियांवर महसूल विभागाची सर्जिकल स्ट्राईक|VIDEO

Samsaptak Drishti Yog: 'या' तीन राशींच्या जातकांच्या जीवनात येणार 'अच्छे दिन'; यशासह मिळेल पैसा अन् प्रसिद्धी

Chanakya Niti: या काळात मेहनत कराच, अन्यथा... चाणक्यांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT