Vasai East Crime News: वसई पूर्वमधून एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. वसईच्या वालीव परिसरत येणाऱ्या भोईदापाडा येथे चोरट्यांनी हिताची कंपनीच्या एटीएममध्ये काल मध्यरात्री ही चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी एटीएम मशीनमधून १४ लाख ८० हजार इतकी रोकड लंपास केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पूर्व वालीव परिसरत येणाऱ्या भोईदापाडा येथे चोरट्यांनी हिताची कंपनीच्या एटीएममध्ये काल मध्यरात्री चोरी केली आहे. या परिसरत रात्रीच्या वेळी लोकांची रहदारी कमी असते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी एटीएमचे शटर तोडून एटीएम मशीनमधून १४ लाख ८० हजार इतकी रोकड लंपास केली आहे.
वालीव परिरासत सलग दुसऱ्या महिन्यात चोरट्यांनी सलग दुसरे एटीएम लुटले आहे. या आधी ३ जून २०२३ वसई वालीव परिसरातील गोलानी नाका येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडून १९ लाख लंपास केले होते. तर १५ जुलै २०२३ रोजी भोईदापाडा येथे १४ लाख ८० हजार इतकी रक्कम चोरी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा तपस करत आहेत. दोन महिन्यात दुसऱ्यांदा मोठी चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांच्या कार्य पद्धतीवर देखील नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.