DCM Ajit Pawar Nashik: 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आज नाशिकमध्ये पार पडत आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार नाशकात आल्याने फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली कणखर नेतृत्व लाभले असून केंद्राच्या मदतीने राज्याला गती देण्यासाठी काम सुरू; अशी ग्वाही दिली.
काय म्हणाले अजित पवार...?
यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी "शासकीय योजनांसाठी लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात, वशिला असेल तरच कामे होतात.. यामुळेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ व्हावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून 11 लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला आहे; असे म्हणत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच पुढे बोलताना अजित पवार यांनी "पावसाने ओढ दिल्याने मोठे संकट दिसत आहे. पेरण्या रखडल्या असून धरणांची स्थितीही चिंताजनक आहे. पांडुरंगाकडे धो- धो पाऊस कोसळेल हीच प्रार्थना करतो. तुम्हाला एकटं सोडणार नाही, तुमच्यासोबत आहे.." अशी ग्वाहीही यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक...
यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. "देशात नरेंद्र मोदी यांच्यामुळे कणखर नेतृत्व लाभले असून त्यांच्या नेतृत्वात राज्याला गती देण्याचे काम करु.. असे ते यावेळी म्हणाले. तसेच नैतिक जबाबदारी घेऊन आम्ही या सरकारमध्ये सहभागी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.