Bacchu Kadu News: सचिन तेंडुलकरच्या त्या जाहिरातीवर तात्काळ बंदी घाला; आमदार बच्चू कडूंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी; असे त्यांनी या पत्रामध्ये म्हणले आहे..
Bacchu Kadu News
Bacchu Kadu NewsSaamtv
Published On

अमर घटारे, प्रतिनिधी...

Bacchu Kadu On Sachin Tendulkar Advertisement News: सध्या इंटरनेटवरील ऑनलाईन गेम्स मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या गेमिंग ऍपमुळे मुलांच्या आरोग्यावर तसेच मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. या ऑनलाईन गेम्सविरोधात प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनीही विरोध दर्शवला असू सचिन तेंडुलकर करीत असलेल्या जुगाराच्या जाहीरातीवर बंदी घालण्याच्या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

Bacchu Kadu News
Shri Vitthal Rukimini Mandir : भाविकांनाे ! पंढरीच्या विठुरायाची पाद्यपूजा, तुळशी पूजा बंद; जाणून घ्या कारण

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) सध्या पेटीएम फस्ट या ऑनलाईन गेमची जाहीरात करताना दिसत आहे. या जाहीरातीवरुन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहले आहे.

या पत्रामध्ये ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीतून लोकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकर यांनी जनतेचा विचार करून अश्या प्रकारच्या जाहिराती करू नये.. अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रामधून केली आहे

Bacchu Kadu News
Nagpur Crime News: महिला डॉक्टर आंघोळ करायला गेली अन् ओरडतच बाहेर आली; नागपुरातील मेडिकल रुग्णालयात काय घडलं?

"सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहे. असंख्य चाहते व भारतरत्न असणार्‍या व्यक्तिने Paytm First सारख्या जुगार चालवणार्‍या app ची जाहीरात करणे योग्य नाही आहे. माझी महाराष्ट्र शासन व सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.." असे त्यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हणले आहे.

"महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक वणूक थांबविण्यात यावी, ही विनंती;" असेही या पत्रात बच्चू कडू यांनी नमूद केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com