Vehicle fire in Naigaon area of Vasai saam tv
मुंबई/पुणे

Vasai Fire News : वसईच्या नायगाव परिसरात वाहनतळातील वाहनांना भीषण आग, १६ दुचाकी जळून खाक

Vehicle fire in Naigaon area of Vasai : स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे या आगीत मोठी दुर्घटना टळली आहे.

चेतन इंगळे

Vasai Vehicle fire News: वसईमधील नायगाव पश्चिमेच्या रेल्वे स्थानकालगत असलेल्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जव१५ ते १६ दुचाकी वाहनं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायगाव पश्चिमेच्या भागात रेल्वे स्थानकाला लागून आणि नायगाव उड्डाणपुलाच्या खाली वाहनतळ आहे. या ठिकाणी अनेक वाहनं पार्किंगमध्ये उभी होती. दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनाने पेट घेतला.

वाहनतळात ही वाहने जवळजवळ उभी असल्याने आग वाढत गेली आणि त्यात १५ ते १६ दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना आणि पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. याआगीत वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Vasai Fire)

या वाहनतळामध्ये शेकडो वाहनं उभी होती. मात्र नायगाव पश्चिमेच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने ती बाजूला केली. त्यामुळे मोठी हानी टळली. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जळून खाक झालेल्या वाहनांचा पंचनामा केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT