New Vande Bharat Sleeper Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

Mumbai- Bengaluru Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरू प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन या मार्गावर धावणार आहे. याचा फायदा पुणेकर आणि सोलापूरकरांना देखील होणार आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई–बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार

  • पुणे, सोलापूर मार्गे ट्रेन धावणार

  • प्रवास वेळ १६-१७ तासांत पोहचणार

  • डिसेंबर २०२६ पर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता

मुंबईसोबत पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्राला पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार असून ही ट्रेन मुंबईवरून पुणे मार्गे बंगळुरूपर्यंत धावणार आहे. मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे मुंबई, पुणेकरांचा प्रवास सुसाट आणि सुखकर होणार आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रवास अगदी कमी तासांत होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीच्या वेळी चालवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सकाळपर्यंत बंगळुरूमध्ये पोहचता येणार आहे.

मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधून बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पण या मार्गावर हाय स्पीड ट्रेन नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खूप तासांचा प्रवास करावा लागतो आणि कधी कधी जास्त वेळ देखील लागतो. त्यामुळे या मार्गावर हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली. केंद्र सरकारने मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे पुण्यातील प्रवासांना देखील फायदा होणार आहे. या ट्रेनच्या अंतिम वेळापत्रक, थांब्याबाबात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण महत्वाची माहिती समोर आली आहे. वंदे भारत स्लीपरमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. बंगळूरु आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या सध्याच्या उद्यान एक्स्प्रेस आणि कोईम्बतूर एक्स्प्रेस या ट्रेनद्वारे प्रवास करताना प्रवाशांना बंगळुरूमध्ये पोहचण्यासाठी साधारणपणे १८ ते २५ तास लागतात. आता मुंबई - बंगळूर दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुलू झाल्यानंतर हा प्रवास फक्त १६ ते १७ तासांत पूर्ण करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बंगळूरू आणि पुणे दरम्यानचा प्रवासही अधिक जलद होईल.

ही ट्रेन मुंबईहून सुटून पुणे, सोलापूर आणि वाडीमार्गे बंगळुरूला पोहोचेल. ही वंदे भारत स्लीपर ट्रेनची सेवा अंदाजे डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय रेल्वेने अद्याप तारखेची घोषणा केली नाही. या ट्रेनचे तिकीट अंदाजे २,५०० पासून सुरू होईल. एसी ३-टियरसाठी अंदाजे २५०० रुपये, एसी २-टियरसाठी ३००० ते ३२०० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी ३६०० ते ३९०० रुपये भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे. तिकीटाचे दर निश्चित राहतील. त्यात कोणतेही बदल होणार नाहीत आणि जेवणाचा समावेश तिकिटाच्या खर्चात असेल. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावण्याची शक्यता असून एक दिवस देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही ठिकाणांहून ट्रेन रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुटण्याची शक्यता आहे. ज्यामुळे प्रवाशांचा रात्रीचा प्रवास आरामदायी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल

IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका; तस्करांकडून गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला

School Reopen: मोठी बातमी! राज्यातील शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर

Petrol Crisis: राज्यात पेट्रोलचा काळाबाजार! किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री, 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यात १८ जूनला २००० रुपये जमा होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT