Vande Bharat Express Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Express : सोलापूर ते पुणे आता अवघ्या ३ तासात; वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी

Mumbai-Solapur-Pune Vande Bharat Express: वंदे भारत रेल्वेची सोलापूर ते मुंबई दरम्यानची चाचणी यशस्वी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Railway News : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर धावणार आहे आणि ते ही अवघ्या तीन तासात.

मुंबई (Mumbai) सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची गुरुवारी यशस्वी चाचणी पार पडली. १० फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर (Solapur) या मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काल या रेल्वे गाडीची चाचणी पार पडली आहे. ताशी 130 किलोमीटर वेगाने ही गाडी धावणार आहे.

१० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने धावणार आहे. ती पुण्यातून (Pune) जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.

सकाळी 6.50 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सुटेल आणि पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ही ट्रेन पुन्हा मुंबईहून निघेल, सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल आणि रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. तसेच एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT