
पहूर (जळगाव) : बैलांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना (Jalgaon News) पहूर येथे गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास घडली. (Live Marathi News)
पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूलमध्ये नववीत शिकणारा रामेश्वर राजू सोनवणे (वय १५) हा विद्यार्थी आज वडिलांना मदत व्हावी; म्हणून बैलांना पाणी पाजण्यासाठी पॉवर हाउसच्या बाजूलाच असलेल्या देवळी धरणावर बैलगाडी घेऊन गेला. त्याने बैल धुण्यासाठी आणि त्यांना पाणी पाजण्यासाठी शर्ट आणि पॅन्ट काढून बैलगाडीवर ठेवली व बैल घेऊन पाण्याजवळ गेला. मात्र तोल गेल्याने तो पडला.
एकच बैल आल्याने परिवाराची धावपळ
दरम्यान एकच बैल घरी परत आल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर घरी न आल्याने घरच्यांना चिंता वाटली. प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहिले असता बैलगाडीवर रामेश्वरचे कपडे निदर्शनास आले. त्यामुळे धरण परिसरात त्याचा शोध घेतला. परंतु, तो आढळून आला नाही. यामुळे पाण्यात शोधले असता पाण्याच्या तळाशी त्याचा मृतदेह आढळून आला.
आईचा आक्रोश
मृतदेह बाहेर काढून तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तडवी यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राजू तुकाराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामेश्वरचा मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला. त्याच्या मागे आई- वडिल, भाऊ- बहीण असा परिवार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.