Nashik Crime News : मालेगावातील शेतकरी महिलेचा मारेकरी सापडला; हत्येचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले!

दहिदी शिवारात कांद्याच्या शेतात पाणी भरणाऱ्या विवाहितेचा खून झाला हाेता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांना यश आले आहे.
Malegaon Police Station
Malegaon Police StationSaam Tv

अजय सोनवणे

Nashik News : नाशिकच्या मालेगाव(Malegaon) तालुक्यातील दहिदी शिवारात कांद्याच्या शेतात पाणी भरायला गेलेल्या सुमनबाई बिचकुले या विवाहत महिलेचा दोन दिवसांपुर्वी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली होती. अज्ञाताने महिलेचे दोन्ही पाय फावड्याने तोडून तिच्यावर वार करत तिचा खून केला होता.

Malegaon Police Station
Mumbai Crime : 2 आफ्रिकन तरुणाकडून 11 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

जिल्हा पोलीस (Police) अधिक्षकांनी तात्काळ याची दखल घेत तपासाची चक्र फिरवली, आरोपीने महिलेला शेतात एकटी असल्याच पाहून तसेच तिच्या अंगावर असलेले चांदीचे दागिने पाहून तिला फरफटत जंगलात नेले.

तसेच तिच्या पायावर वार करत पायातील चांदीचे दागिने पाय तोडून काढत फरार झाला होता. पोलिसांच्या पथकाने तपास करीत फरार आरोपीला ताब्यात घेतले. संशयित आरोपी चांदीचे दागिने घेऊन जिल्ह्यातील करंजवण येथील सोनाराकडे गेला असता संबंधित सोनाराने याची माहिती पोलिसांना दिली. (Nashik Crime News)

Malegaon Police Station
Solapur Fire : नई जिंदगी परिसरात भीषण आग; दाेन दुकाने जळून खाक, लाखाेंचे नुकसान

आरोपी डोंगराळे शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने तलावात उडी मारली. अखेर दोघा पोहणाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लूट करण्याच्या उद्देशाने आरोपी किरण याने हे कृत्य केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com