Prakash Ambedkar saam tv
मुंबई/पुणे

Prakash Ambedkar:...तर आमचे दरवाजे खुले, प्रकाश आंबेडकरांचा INDIA आघाडीसमोर प्रस्ताव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prakash Ambedkar:

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्सची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे. या आघाडीत भाजपविरोधी पक्षांचा समावेश असून या बैठकीत देखील भाजपविरोधी पक्षांना आमंत्रण देण्यात आलंय. असं असले तरी वंचित बहुजन आघाडी पक्षाला मात्र या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. वंचितला इंडिया आघाडीत जायचं आहे. परंतु काँग्रेसकडून निमंत्रण मिळत नसल्याचं अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी सांगितलं. (Latest News)

याउलट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आमंत्रण स्विकारलं नसल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून थेट प्रश्न विचारला. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीविषयी प्रश्न करण्यात आला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत. महाविकास आघाडीत चर्चाच होत नाही. बैठकीची तारीख ठरत नाही.

इंडिया आघाडीवर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीच्या पक्षात जागावाटप ठरलेलं नाही. त्यानंतर सेना आणि वंचित यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा होईल. वंचितने आघाडीत सामील व्हावे, असं म्हटल जाते. परंतु काँग्रेसकडून काहीच उत्तर मिळत नसल्याचा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. इंडिया आघाडीत आम्हाला सहभागी व्हायचं आहे. त्यासाठीच्या अटीसह आम्हाला त्याबद्दल चर्चा करायची आहे. पण त्यावर त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाहीये.

दरम्यान याप्रकरणी वंचितकडून १ सप्टेंबर २०२३ रोजी आम्ही मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहण्यात आलं होतं, त्यावर अजून त्यांचे उत्तर आलेलं नाहीये.

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता प्रियदर्शी तेलंग यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी काँग्रेसने आघाडीसाठी नकार दिल्याची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवलीय. जर INDIA भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यासाठी खरोखर गंभीर असेल. तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. त्यात आघाडीत आम्हाला सामावून घ्यावं अशी इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवलीय. आघाडीच्या चर्चेसाठी आमचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचं वंचित बहुजनकडून सांगण्यात आलंय.

इंडिया आघाडीची स्टॅटजी नाही

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघडीत जायचं आहे, परंतु काँग्रेसकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाहीये. प्रियदर्शीं तेलंग यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीचं आमंत्रण स्विकारत नाहीत असा अपप्रचार सुरू आहे. परंतु काँग्रेसकडून वंचितला कोणतेच आमंत्रण देण्यात आले नसल्याचं तेलंग म्हणालेत. वंचितला लोकसभा निवडणूक, २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ मध्ये अनुक्रमे ६.९८ आणि ५.५७ टक्के मते मिळवली तरीही त्यांना इंडिया आघाडीत स्थान देण्यात आलेलेलं नाहीये.

४८ जागांवर निवडणूक लढवणार

लोकसभेच्या निवडणुका कधीही लागतील, अशी परिस्थिती आहे. परंतु जागांची वाटाघाटी झाली नसल्याने आम्ही ४८ जागांच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत. आमच्या सभा आता सुरू होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. महाविकास आघाडीतील पक्षात जागा वाटप ठरलेलं नाही. त्यानंतर सेना आणि वंचित यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT