Vaishnavi Hagawane Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: लग्न करेल तर शशांकशीच, वैष्णवीच्या हट्टापुढं हतबल झाले वडील; अनिल कस्पटेंनी सांगितलं काय घडलं?

Vaishnavi Hagawane Case: पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या लग्नाला तिचे वडील अनिल कस्पटे यांचा विरोध होता. पण मुलीच्या सुखापुढं आणि हट्टापुढं त्यांनी शशांकसोबत तिचे लग्न लावून दिलं.

Priya More

वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या लग्नाला तिच्या वडिलांना विरोध केला होता. वैष्णवीचं दुसरीकडे लग्न जुळू नये याठिकाणी शशांकच्या कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले. यावरून शशांकच्या कुटुंबीयासोबत वाद देखील झाला होता. मी इतर कोणाशीच लग्न करणार नाही. मी लग्न करेल तर शशांकसोबत असे वैष्णवीने वडिलांना सांगितले होते. वैष्णवीच्या या हट्टापुढं हतबल होऊन तिच्या वडिलांनी तिचे लग्न शशांकसोबत लावून दिलं.

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी सांगितले की, 'वैष्णवीने शशांक हगवणेसोबत लव्ह मॅरेज केले होते. २०२३ मध्ये शशांक आणि वैष्णवीचे लग्न झाले होते. शशांक आणि वैष्णवीचे प्रेम कॉलेजमध्ये असताना होते की आणखी कुठून झालं हे माहिती नाही. पण आमच्या गावातील एका गृहस्थाने मला शशांकची पत्रिका दाखवली. घरची परिस्थिती चांगली आहे, मुलगा चांगला आहे बघा तुम्ही असं ते मला म्हणाले होते. मी दोन दिवसांनी माहिती घेऊन सांगतो असे त्यांना सांगितले होते. आमच्या गावाच्या शेजारी त्यांचे गाव आहे. चांदणी चौकाच्या आतमध्ये त्यांचे गाव आहे. त्यागावातला हा मुलगा असल्यामुळे मी चौकशी केली. प्रतिष्ठा असली तरी मला त्यांच्यावर विश्वास नव्हता. कारण त्यांच्या घराची रूपरेषा, त्यांच्या घराचे बॅकग्राऊंड मला कळाले होते. चौकशी केल्यानंतर मी त्या व्यक्तीला सांगितले की मला मुलगी द्यायची नाही.'

'त्यानंतर २ -४ महिन्यांनी मी वैष्णवीसाठी दुसरीकडून स्थळं पाहायला सुरूवात केली. चांगली स्थळं आली होती पण त्या दोन्ही लोकांना शशांकने फोन करून माझ्या मुलीसोबत अफेअर सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे समोरच्या लोकांनी लग्न जमणार नाही असे सांगितले. त्यानंतर माझ्याकडे पर्याय उरला नाही. गावात बदनामी होईल यामुळे मी शेवटी शशांकच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

'त्याआधी हगवणे कुटुंबीयांची आम्ही भेट घेतली होती. शशांक, सुशील हे जुळे भाऊ आहेत. ते दोघे, करिश्मा आणि शशांकची आई यांना मी भेटलो. मी त्यांना सांगितले होते की, तुम्ही असे करू नका, माझ्या मुलीचं लग्न मोडू नका अशी विनंती केली. मी त्यांना सांगितले होते की मी एखाद्या भिकाऱ्याला मुलगी देईल पण तुम्हाला देणार नाही. त्यानंतर ते आमच्या मुलीला पळवून नेण्यासाठी आले होते. पण आम्ही मुलीला अडवलं. पण माझ्या मुलीची मानसिकता होती की मी दुसरीकडे लग्न करणार नाही. लग्न करेल तर त्याच्याशीच असं ती म्हणाली होती. शेवटी तिच्या सुखासाठी मी पर्यायाने त्यांचे पाय धरले आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना कळाले की आता हे कुठे जात नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT