Vaishnavi Hagawane News : विनाकारण बदनामी, चूक असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी प्रकरणावर अजितदादा संतापले

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात नाव येताच अजित पवार संतापले. "माझी चूक असेल तर फासावर लटकवा," असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी राजेंद्र हगवणेंना पक्षातून हाकलले असून पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य दिल्याचे सांगितले.
Vaishnavi Hagawane Case:
Vaishnavi Hagawane Case: Saam TV News
Published On

Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलाने वैष्णवीचा खून केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणात अजित पवार यांचेही नाव घेतले गेले. वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. अजितदादांनी वैष्णवी आणि शशांक यांना फॉर्च्युनर कारची चावी दिली होती. या प्रकऱणात अजित पवार यांच्यावर टीका होत होती. अजित पवार यांनी याप्रकरणात आधी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हाकालपट्टी केली. त्यानंतर आपला या प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मी कुणाच्या लग्नात गेले, त्यात काय चुकी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फॉर्च्युनर कार दिली का घेतली? असं मी त्यावेळीच विचारलं होतं. मी कुणाच्या लग्नात गेलो, त्यात माझी चुकी काय? हगवणे प्रकरण समजताच मी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून कारवाईचा आदेश दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आणखी तीन जण फरार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपी जिथे कुठे असतील, तिथून मुसक्या आवळून आणा असे सांगितलेय, असे अजित पवार म्हणाले.

Vaishnavi Hagawane Case:
Vaishnavi hagavne: 'वैष्णवीचा नवरा मला मारायचा, म्हणून माझे हात..', वैष्णवीच्या मोठ्या जाऊ बाईंकडून गौप्यस्फोट

अजितदादा संतापले -

वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर अजित पवार संतापले. माझ्या बदमानीचा कट आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. माझी काही चूक असेल तर फासावर लटकवा, असे अजित पवार म्हणाले. हगवणे यांच्यासारखी नालायक माणसं माझ्या पक्षात नको. गरिबांच्या दारात जाईन मात्र असल्या नालायक लोकांच्या दारात जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

Vaishnavi Hagawane Case:
Vaishnavi Hagawane: आमचं बाळ आमच्याकडे आलं याचा आनंद, वैष्णवीचा मुलगा आजी-आजोबांकडे सोपवला | VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले ?

वैष्णवी हगवणे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारे आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची चौकशी हत्येच्या अनुषंगानंच होणार आहे. दोषींवर कारवाई करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com