Vaishnavi Hagawane Case X
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवी प्रकरणात नवा ट्वीस्ट, दमानियांनी पोस्ट केला फोटो

Vaishnavi Hagawane Dowry Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवी ट्वीस्ट समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत.

Yash Shirke

वैष्णवी हगवणे या तरुण विवाहितेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी वैष्णवीला तिच्या सासरचे लोक त्रास देत होते. छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिची आत्महत्या झाली नसून हत्या झाली आहे, असा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. २३ वर्षीय तरुणी वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना ठेचून काढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. हे कुटुंब विकृत मानसिकतेचे आहे. याला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.

अंजली दमानिया यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यात शरीरावर जखमांचे व्रण पाहायला मिळतात. ट्वीटच्या कॅप्शनमध्ये अंजली दमानिया यांनी 'वैष्णवीचे सगळ्यात जास्त हाल तिची नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायची आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि सासरे राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर, सुशील ला देखील छळल जायचं. ह्या कुटुंबाला खूप खूप खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे', असे म्हटले आहे.

वैष्णवी हगवणेच्या नवऱ्याचे, शशांक हगवणेचे मामा आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर देखील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी जानेवारी २०२५ पासून सुरु आहे, अशी माहिती देखील अंजली दमानिया यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. त्यांनी काल (२१ मे) वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केलेल्या एफआयआरबाबतचे अपडेट्स दिले होते.

वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वैष्णवीची जाऊबाई मयुरी हगवणेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यांनी हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलाही सासरच्या मंडळींकडून कायम छळ आणि त्रास सुरु होता, जानेवारी महिन्यात हगवणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असे मयुरीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT