Vaishnavi Hagawane Rajendra Hagawane Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane प्रकरणातील फरार आरोपी 'राजेंद्र हगवणे' कोण आहेत?

Vaishnavi Hagawane News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजेंद्र हगवणे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Yash Shirke

वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणात राजेंद्र हगवणे हे नाव चर्चेत आहे.

१६ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टममध्ये वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. यावरुन वैष्णवीला मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक केली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत.

कोण आहेत राजेंद्र हगवणे?

राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते. वैष्णवी मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे. वैष्णवीचा मृत्यू हुंड्यापायी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनेकडून, तिच्या माहेरच्यांकडून हुंडा घेणे; अधिकच्या पैशांची, संपत्तीची मागणी करणे; त्यासाठी तिचा शारीरीक आणि मानसिक छळ करणे, एका प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरुन राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार) हकालपट्टी करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, मुलगी, दोन्ही मुलगे अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शोध सुरु आहे. बाकी तिघांना अटक करण्यात आली आहे. शशांक आणि वैष्णवी यांचे बाळ वैष्णवीच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT