Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: आत्महत्या केली त्या दिवशी वैष्णवीसोबत काय घडलं होतं? माहेरच्यांनी सांगितली करुण कहाणी

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली. त्या दिवशी वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं होतं हे तिच्या माहेरच्यांनी सांगितलं.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. १६ मे रोजी ही घटना घडली होती. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं होतं. याप्रकरणी वैष्णवीच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत. वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याबाबतची धक्कादायक माहिती तिच्या काकांनी दिली आहे.

वैष्णवीने शशांकसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. वैष्णवीच्या लग्नाला तिच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. तरी देखील शशांकच्या कुटुंबीयांकडून होणारी जबरदस्ती आणि वैष्णवीने देखील शशांकसोबतच लग्न करेल असा हट्ट केला होता. शेवटी वैष्णवीच्या वडिलांनी तिचे लग्न शशांकसोबत लावून दिले होते. लग्नाच्या काही महिन्यातच तिचे सासरची लोकं हु्ंड्यासाठी तिचा छळ करू लागले. तिला सतत मारहाण केली जात होती. माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली.

वैष्णवीच्या काकांनी तिच्यासोबत १६ मे रोजी नेमकं काय घडलं याची धक्कादायक माहिती सांगितली. ते म्हणाले की, '१६ तारखेला सकाळी तिला टॉर्चर करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिघी जणी घरातून बाहेर गेल्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तिला पुन्हा मारहाण केली. अमानुषपणे तिला त्यांनी मारलं. त्यानंतर वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले.' तसंच, 'अजितदादांचं त्यांना पाठबळ असावे म्हणून ती केस ओपन होत नाही. वेळ आली तर आम्ही अजितदादांशी बोलू पण आमची तिथपर्यंत पोच नाही. आरोपींना पकडण्यासाठी दादांनी मदत करावी. कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल.', असं देखील वैष्णवीचे काका म्हणाले.

दरम्यान, वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. पण तिने आत्महत्या केली नसून तिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिचा पती, सासू-सासरे, दीर आणि नणंद छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वैष्णवीने शंशांकसोबत लव्ह मॅरेज केले होते. त्यांचे २०२३ मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केले होते. पण लग्नाच्या सहा महिन्यातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली होती. हुंड्यासाठी तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT