Vaishnavi Hagawane Death Case  Saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; ११ आरोपींविरोधात १,६७० पानी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

Vaishnavi Hagawane Case News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आलीये. या प्रकरणातील ११ आरोपींविरोधात १,६७० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण अकरा आरोपींविरोधात पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दोषारोपपत्र एकूण १६७० पानांचे असून त्यात सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे.

सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), दीर सुशील राजेंद्र हगवणे (सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम), वैष्णवी यांच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवलं.

त्यांनंतर तिच्या नातेवाइकांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र आणि सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोनगोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

पुण्यातील गुडलक कॅफे अन्न औषध प्रशासनाने परवाना रद्द केल्यानंतर हॉटेल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद केल्याचा बोर्ड हॉटेल मालकाने लावलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने तात्पुरता परवाना निलंबित केल्यानंतर हॉटेलला टाळं लावण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT